संजीवनी डिफेन्स अकॅडमी ची दमदार सुरुवात…
कोपरगावात सैन्यदल भरतीसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू
कोपरगाव : पंचक्रोशीतील व परिसरातील युवकांना सैन्य व पोलीस दलात संधी उपलब्ध करून देण्यासाठी
संजीवनी डिफेन्स अकॅडमी (पूर्वीची संजीवनी पीसीटीसी) चे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्ण केलेल्या सुरक्षा दलांमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
पूर्वी संजीवनी ‘पीसीटीसी’ या नावाने कार्यरत असलेल्या या संस्थेतून आतापर्यंत सुमारे
२८०० हून अधिक विद्यार्थी विविध सैन्य दलांमध्ये भरती झाले असून,
हीच परंपरा अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने आता संजीवनी डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून नव्या स्वरूपात कार्य सुरू करण्यात आले आहे.
परिसरातील अधिकाधिक युवकांनी देशसेवेत योगदान द्यावे, यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रशिक्षणामध्ये सैन्य दलातील अग्निवीर भरती, पोलीस दलातील विविध भरती प्रक्रिया तसेच
रेल्वे विभागातील विविध स्पर्धात्मक भरतीसाठी आवश्यक असलेले शारीरिक, बौद्धिक व लेखी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अद्ययावत सुविधा, अनुभवी मार्गदर्शक आणि नियोजनबद्ध सराव यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणाची सवय होऊन
त्यांची निवड होण्याची शक्यता अधिक वाढणार आहे.
हा उपक्रम संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी या शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह ब्रँडचा असून,
संस्थेने शिक्षण क्षेत्रात जशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्याच दर्जाची गुणवत्ता या प्रशिक्षणातही दिसून येत आहे.
हे प्रशिक्षण केवळ भरतीपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, शिस्त, आत्मविश्वास आणि
सामाजिक जीवनातील कौशल्यांमध्येही सकारात्मक बदल घडविणारे ठरणार आहे.
सदर प्रशिक्षण संजीवनी सैनिकी स्कूल व जुनिअर कॉलेज, टाकळी फाटा, कोपरगाव-येवला रोड,
तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे सुरू करण्यात आले असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: ७३०३०३१७८२

