स्पंदन 2026 मध्ये संजीवनी आयुर्वेदाच्या विद्यार्थिनींचा सुरेल झंकार; राज्यस्तरीय यशाची नोंद

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स यांच्या वतीने आयोजित ‘युथ फेस्ट 2026’ अंतर्गत चिंचोली (सिन्नर) येथे पार पडलेल्या ‘स्पंदन 2026’
या राज्यस्तरीय संगीत महोत्सवात राज्यभरातील हेल्थ सायन्स महाविद्यालयांमधील
30 हून अधिक संघांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत संजीवनी आयुर्वेदा कॉलेज व रिसर्च सेंटर, कोपरगाव
येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा लौकिक उंचावला.

सोलो वेस्टर्न व्होकल प्रकारात विद्यार्थिनी प्रीती अनिल शेजवळ
हिने नाशिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावत आपले कौशल्य सिद्ध केले, तर
कुमारी श्रुती नामदेव पठारे हिने सोलो लाईट इंडियन व्होकल प्रकारात
तृतीय क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम राखली.

राज्यस्तरीय युवा सांस्कृतिक महोत्सवात संजीवनीचे विद्यार्थी विविध कलाप्रकारांमध्ये
सातत्याने आपली छाप उमटवत असून, या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण सराव
आणि संस्थेकडून मिळणारे योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.

संगीत शिक्षणासाठी शुभम जाधव सर व महेश सर यांचे मार्गदर्शन लाभले, तर संघ व्यवस्थापनासाठी
डॉ. मसने सर व डॉ. शितल अष्टेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांचे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन
प्रगतीवर बारकाईने लक्ष असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या प्रत्येक बाबतीत
संस्थेचा भक्कम पाठिंबा असल्याचे अधोरेखित झाले.


“संस्थेचे अध्यक्ष मा. नितीनदादा कोल्हे, व्यवस्थापकीय विश्वस्त अमितदादा कोल्हे, यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकास यांचा समतोल साधत संजीवनी संस्था विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवत आहे.वैद्यकीय शिक्षणातून सक्षम डॉक्टर घडविण्याबरोबरच ते उत्तम नागरिक म्हणून समाजात वावरावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

:सुमित नि.कोल्हे  (विश्वस्त, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी कोपरगाव )