संजीवनीमुळे ग्रामीण मुलं बनत आहेत नोकरदार

या विद्यार्थ्यांत  मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या आदित्य संदीप जगताप, श्रुती उमेश  साबळे, ओम अरून वाघमोडे, सैफ मुशीर  मुलानी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाच्या ओम राजेंद्र कुलकर्णी व प्रेम मनोज मुळे यांचा समावेश  आहे.
   संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी डॉ. एम. व्ही. नागरहल्ली, डॉ. विशाल  तिडके, डॉ. प्रसाद पटारे, आदी उपस्थित होते.

  यावेळी बोलताना श्री अमित कोल्हे म्हणाले, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे करिअर घडवीण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातात. येथील ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग, उद्योग जगत आणि विद्यार्थी यातील दुवा म्हणून काम करतो. उद्योगाला हवे असलेले अभियंते घडवीण्यावर भर दिला जातो. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळते.

मी कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील शेतकरी कुटूंबातील आहे. संजीवनीत मेकॅनिकल विभागात आम्हा सर्व विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळाले.  कॉलेजच्या ऑटोनॉमस दर्जामुळे उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाचा लाभ झाला. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाने आमच्यावर खूप मेहेनत घेतली. त्याचा  परिणाम म्हणून ‘युनो मिंडा  लिमिटेड’ या नामांकित कंपनीत माझी चांगल्या पॅकेजवर निवड झाली आणि माझे व माझ्या आई वडीलांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले.-  आदित्य जगताप (विद्यार्थी, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज)