संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या कामगिरीने संजीवनीचे विद्यार्थी नोकरीत आघाडीवर

कोपरगाव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. या कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेज ऑफर केले आहे. एआय आधारित सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरविणारी ही कंपनी नोएडा येथील असून तिचे कार्यक्षेत्र अमेरिका, कॅनडा व सिंगापूरसारख्या देशांत विस्तारलेले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम सत्राची परीक्षा अद्याप द्यायची असून त्यापूर्वीच त्यांच्या हाती नोकरीची ऑर्डर मिळाली आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संजीवनीचे विद्यार्थी नोकरीत कायम आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अश्विनी नितिन मुंगसे, धनश्री जगदीश शहाणे, समृद्धी महेंद्र बोरावके तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेचे अथर्व संजय भवर, शताक्षी सतीश भुसारी, हर्षल उमेश पाटील, प्रज्वल राजस सरोदे, श्रेयश चंद्रशेखर तळेकर व जयेश संजय थेटे यांचा समावेश आहे.

संजीवनीचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग औद्योगिक क्षेत्राशी सातत्याने समन्वय ठेवून विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रशिक्षण देतो. विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित होऊन परीक्षेपूर्वीच नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.

संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अभिनंदन केले आहे.

विद्यार्थिनीची प्रतिक्रिया:

“माझ्या भावाचे करिअर संजीवनीतच घडले. त्यामुळे मी निशंक मनाने प्रवेश घेतला. आज माझे स्वप्न पूर्ण झाले. मला ‘स्मार्ट पाथहोल डिटेक्शन सिस्टिम युझिंग एआयएमएल’ हा प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. त्यामुळे एआय आधारित कंपनीत नोकरी मिळवणे सोपे झाले. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतली.”

– धनश्री शहाणे