उत्तर महाराष्ट्र  व मराठवाडामधुन संजीवनी ठरले एकमेव
भारत सरकारच्या शिक्षण  मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ   अक्रिडिटेशन  (एनबीए), नवी दिल्ली’ या स्वायत्त संस्थेने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी या विभागांचे  एनबीए-टीअर वनच्या आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) माणकांनुसार ( वाशिंग्टन  अॅकाॅर्ड )मुल्यांकन करून तीन वर्षांसाठी  नुकतेच मानांकन बहाल केले आहे. या अवघड व कठिण निकषांनुसार  मुल्यांकन करून घेणारे व एनबीए-टीअर वन मानांकन  प्राप्त करणारे संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज हे उत्तर महाराष्ट्र  व मराठवाड्याातील पहिले इंजिनिअरींग काॅलेज ठरले असुन या यशामुळे  संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक कीर्तिमान स्थापित झाला आहे.
या अभुतपूर्व यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे. तसेच संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांचे हस्ते व चिफ टेक्निकल ऑफिसर  श्री विजय नायडू यांचे उपस्थितीत गौरव सोहळा नुकताच युनिव्हर्सिटीच्या टेडेक्स हाॅल मध्ये संपन्न झाला. यावेळी डायरेक्टर डाॅ. आर. ए. कापगते, एनबीए संस्था समन्वयक डाॅ. जी. विजयकुमार, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. ए. एस. सय्यद, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. पी. एम. पटारे, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी विभाग प्रमुख डाॅ. एम.ए. जावळे, या तीनही विभागांचे एनबीए समन्वयक डाॅ. एस.व्ही. पाटणकर, डाॅ. एल. एस. धामंदे, प्रा. ए. ए. बारबिंड, डीन अकॅडमिक्स डाॅ. ए.बी. पवार, हेड ऑफ इन्स्टिटयूट  सर्विसेस श्री प्रकाश  जाधव, हेड ऑफ  अकॅडमिक गव्हर्नन्स डाॅ. आर. एस. शेंडगे  व रजिस्ट्रार प्रा. वाय. ए. पवार यांचा सत्कार करण्यात आला. सदर गौरव सोहळ्यास  इतर विभागांचे प्रमुख, डीन्स व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या  संख्यने उपस्थित होते.
माजी मंत्री व संस्थापक स्व.शंकरराव  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ सालापासुन एनबीएच्या कसोटीला सामोरे जाणारे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे ग्रामिण महाराष्ट्रातील  एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहेे. तेव्हापासुन सर्वच पात्र विभाग मानांकन प्राप्त ठरले आहेत. आता या तिनही विभागाने टिअर १ च्या आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सार मुल्यांकन करून घेवुन एनबीए मानांकन  प्राप्त केले. यामुळे विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय  पातळीवर प्रत्येक क्षेत्रात फायदा होणार आहे.
एनबीए मानांकन प्राप्त तीनही विभागातील मागील तीन वर्षातील  प्रवेश  संख्या, पी.एच.डी. असणारे शिक्षक , विद्यार्थी-शिक्षक  प्रमाण, प्रथम वर्षात  प्रवेश  घेतलेल्या  सलग चार वर्षात  उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे  वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागामार्फत विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे  प्रमाण, शिक्षकांनी आधुनिक ज्ञानवृध्दीसाठी पुर्ण केलेले परीसंवाद, सादर केलेले शोधनिबंध व कार्यशाळांची संख्या, कन्सलटन्सी, विद्यार्थ्यांनी  विविध क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, सुसज्य प्रयोगशाळा , नामांकित कंपन्या व परदेशी  विद्यापीठांशी  केलेले सामंजस्य करार, अशा  अनेक बाबींचा चढत्या कमानीचा अहवाल एनबीए कार्यालयाला सादर केला होता. विशेष  म्हणजे नवोदित अभियंत्यांना वार्षिक  पॅकेज रू ३२ लाखांपर्यंतच्या दिलेल्या नोकऱ्या , या उपलब्धीची एनबीए समितीने विशेष  दखल घेतली.   सदर प्रसंगी प्रा. कापगते यांचे सह सर्व संबंधित विभाग प्रमुखांची भाषणे  झाली

हा सोहळा केवळ मानांकनाचा उत्सव नाही, तर तो आपल्या संस्थेच्या दुरदृष्टीचा , चिकाटीचा, संघभावनेचा आणि उत्कृष्टतेच्या  अखंड ध्यासाचा उत्सव आहे. या यशामागे  प्रत्येक घटकाचे समर्पण आहे. देशात  सुमारे १२२२ स्वायत्त महाविद्यालये आहेत. त्यामध्ये पहिल्या २०० च्या वर्गवारीमध्ये संजीवनी आहे.. महाराष्ट्रात  सुमारे १२२ ऑटोनॉमस  इंजिनिअरींग काॅलेज आहेत. त्यात फक्त २० महाविद्यालयांना एनबीए टीअर वन मानांकन प्राप्त  आहे. राष्ट्रीय शिक्षण  धोरण २०२०  च्या अनुषंगाने  आपण आता एम्पावर्ड ऑटोनॉमीकडे वाटचाल करणार आहोत. स्व. शंकरराव  कोल्हे यांना अपेक्षित असलेल्या ‘ऑटोनॉमस ’ स्टेटसची  प्राप्ती आपण संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  केली. यापुढे ही आपण वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित करू-श्री अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी व मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स