उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम
कोपरगांव: महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळाने (एमएसबीटीई) एप्रिल/मे २०२६ मध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले असुन यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकचा निकाल उत्कृष्ट  लागला आहे. यात काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजीच्या तृतिय वर्षातील  विद्यार्थी शुभम प्रकाश  पवार याने शेकडा ९७. ५३  टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडवत संजीवनीतुन मिळालेल्या दर्जेदार शिक्षणाची  पावती दिली. या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी  काही विषयांमध्ये १००  पैकी १००  व ९५ पेक्षा अधिक गुण मिळवुन संजीवनीच्या शैक्षणिक  गुणवत्तेची साक्ष नोंदविली, अशी  माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
तृतिय व द्वीतिय वर्षांचा शाखा  निहाय निकाल पुढील प्रमाणे. कंसात विद्यार्थ्याने  मिळविलेले शेकडा गुण व अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा असा गुणानुक्रमांक.
तृतिय वर्ष :  काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-शुभम प्रकाश  पवार (९७. ५३), सेजल गणेश  सुपनर व टीना मुकेश  तळेले (९७. ४१), हितेन समिर शाह  (९७.२९). मेकॅट्राॅनिक्स-वैष्णवी  बाबासाहेब मापारी (९६. ८३), आदित्य सुनिल डुचे (९५. ६७ ), सिध्दी संदीप भाकरे (९५. ४४). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-माधव भागवत कातडे (९४. ११),नंदीनी सचिन मगर (९३. ४७), मनीष  सिध्दार्थ वैद्य (९२. ७४). मेकॅनिकल इंजिनिअरींग-गिरीश  प्रविण तांदळे (९१.३३), कार्तिक केशव वरखडे (८८. ०६), अक्सा बद्रुद्दिन शेख (८७. ८९). सिव्हिल इंजिनिअरींग-देविदास बापु खलाने  (८९. ६७ ), अंजली नारायण जाधव (८८. ५६), श्रावणी सतिश  सोनजे (८४. ५०)
द्वीतिय वर्ष  काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी- तेजल ज्ञानेश्वर  नागरे (९६. ४१), दिशा  अनिल दोंड (९६. २९), विभुती बाबासाहेब औताडे (९४. ७६).मेकॅट्राॅनिक्स-साई निलेश  परदेशी  (९०.४४), सार्थक शरद वाघ (८९. ५६),वेदांत अरूण गवळी (८९. ३३). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-रेणुका भाऊसाहेब माताडे (८९. ४१), अस्मिता सुभाश चौधरी (८९. २९), नेहा सतीश  मिश्रा (८८. ९४).मेकॅनिकल इंजिनिअरींग-अथर्व संजय होन  (९२. २२), सृष्टी  रंगनाथ गुरसळ (८९.९४), रेहानखान अर्षदखान पठाण (८६. ६७). सिव्हिल इंजिनिअरींग- शिवानी  संभाजी काळे (८९. ६७), श्रुती गणेश  जपे (८३. ०९) व साईश  छगन कदम (७८. २३). संजीवनी पाॅलीटेक्निकला ऑटोनॉमस  दर्जा असल्यामुळे एमएसबीटीईच्या निकालात प्रथम वर्षाचा  उल्लेख नाही.
संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, प्राचार्य व विभाग प्रमुखांचे उत्कृष्ट निकालाच्या कायमच्या परंपरे बद्दल  अभिनंदन केले आहे.