संजीवनी ज्युनिअर कॉलेजमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन
माजी विद्यार्थिनींचे अनुभव कथन; विद्यार्थ्यांना प्रेरणा

वैजापूर : शिक्षण क्षेत्रात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देत अल्पावधीतच वैजापूरमध्ये मानाचे स्थान निर्माण केलेल्या संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिकाधिक प्रेरणा मिळावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून) रोजी कॉलेजच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील संधींविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात याच कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण होऊन सध्या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या कु. श्रुती शेळके व कु. अनर्थे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, संजीवनीसारख्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश नक्की मिळते. तसेच कॉमर्स शाखेतूनही वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचेही त्यांनी समाधान केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कॉलेजचे प्राचार्य श्री. विनोद शेटे यांनी सांगितले की, माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून उभारलेली संजीवनी संस्था आज एक विशाल वटवृक्ष बनली आहे. या संस्थेतून घडलेले विद्यार्थी जगातील ३५ पेक्षा अधिक देशांमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य असून त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

संजीवनी आयुर्वेदाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, संस्थेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक कॉलेजच्या भव्य व अत्याधुनिक हॉस्पिटलचे काम सध्या सुरू असून २५ ते ३० किलोमीटर परिसरात सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे एकमेव हॉस्पिटल ठरणार आहे.
वैजापूर कॉलेजमधून उत्कृष्ट गुण मिळवून विद्यार्थी घडण्यामागे संस्थेचे विश्वस्त श्री. सुमित दादा कोल्हे यांचे मार्गदर्शन व व्यवस्थापनाचे सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही प्राचार्य शेटे यांनी नमूद केले. तसेच संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. अमित कोल्हे व अध्यक्ष श्री. नितीनराव कोल्हे यांचा पाठिंबा, प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.