ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ञ प्राद्यापकांनी एर्डोस रिसर्च स्थापन केलेली संस्था
कोपरगावः कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रातील नवे संशोधन व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने आज ऑक्सफर्ड विद्यापिठातील तज्ञ प्राद्यापकांनी स्थापन केलेल्या एर्डोस रिसर्च संस्थे सोबत परस्पर सामंजस्य करार (एमओयु) केला. एर्डोस संशोधन संस्थेचे संशोधक  व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राद्यापक प्रा.अजित जावकर आणि संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी या करारावर आज स्वाक्षऱ्या  केल्या. या करारामुळे संजीवनी विद्यापीठाने जागतीक पातळीवर एआय (कृत्रिम बुध्दिमत्ता) क्षेत्रात महत्वाचे पाऊल टाकले आहे. या एमओयु अंतर्गत संजीवनीमध्ये  एआय असिस्टंट रिसर्च सेंटर स्थापण होणार आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठाला हेच अपेक्षीत आहे, अशी प्रतिक्रीया प्रा.जावकर यांनी व्यक्त केली. उपस्थितीत प्राध्यापक व संशोधकांनी टाळ्यांच्या  गजरात या कराराचे स्वागत केले. संजीवनी विद्यापीठाच्या दृष्टीने आजचा दिवस एआय तंत्रज्ञाना सोबत वाटचाल करण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल. अशी प्रतिक्रीया संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री  नितीनदादा कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या सभागृहात हा परस्पर सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, स्ट्रटेजिक अॅडव्हायझर डॉ. शांतम शुक्ला, संजीवनी शैक्षणिक  संकुलातील विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य, डीन आणि विविध  विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.जावकर म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्तेचा  (एआय) वापर जगभर प्रत्येक क्षेत्रात वाढला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा मुळ उध्देश संशोधनाच्या माध्यमातुन दैनंदिन अडचणी सोडविणे हा आहे. संशोधनात्मक वातावरण संजीवनी युनिव्हर्सिटी मध्ये तयार व्हावे यासाठी हा करार महत्वाचा ठरेल. एर्डोस रिसर्च संस्था ही ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआय तज्ञ प्राध्यापकांची आहे.  एआय संदर्भातील विद्यार्थ्यांना स्किल सेट देण्याच्या उद्देशाने तीची स्थापना केली आहे.
श्री अमित कोल्हे म्हणाले, संजीवनी युनिव्हर्सिटी ही रिसर्च ड्रिव्हन (संशोधन  आधारीत) युनिव्हर्सिटी व्हावी, अशी संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांची संकल्पना, आजच्या करारामुळे साकार होईल. संजीवनी शैक्षणीक संकुलाचे अध्यक्ष श्री नितिनदादा  कोल्हे म्हणाले, संजीवनी विद्यापीठात या करारामुळे नवा अध्याय सुरू झाला. आजचा दिवस संस्मरणीय ठरणार आहे. संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी यांनी सुत्रसंचालन केले तर स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड  टेक्नॉलॉजीच्या डीन डॉ. कविथा राणी यांनी आभार मानले.