वैजापूर :
शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संजीवनी अकॅडमी, वैजापूरने यंदाच्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत आपला दर्जा सिद्ध केला आहे. केवळ निकालाचा टक्का नव्हे, तर गुणवत्तापूर्ण यश, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि व्यवस्थापनाचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन यामुळे या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या वर्षी एकूण ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ५ विद्यार्थ्यांनी ९० ते १०० टक्के गटात स्थान मिळवून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली. ८१ ते ९० टक्के गटात १७, ७१ ते ८० टक्के मध्ये ११, ६१ ते ७० टक्के मध्ये ७, तर ५१ ते ६० टक्के गटात १ विद्यार्थी आहे. या आकडेवारीतून ‘टॉप क्लास’ निकालाची ठोस छाप स्पष्ट दिसून येते.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये
अनुज अरुण जगताप (९३.२%) प्रथम
प्रणव गणेशकुमार कांबळे (९२.०%) द्वितीय ,
रत्नय सुरेंद्र संचेती व
नील संतोष संचेती (प्रत्येकी ९१.०%) संयुक्त तृतीय क्रमांकावर राहिले.
आगम योगेश संचेती (९०.०८%) चौथा,
अनुज रवींद्र उराडे (८९.८०%) पाचवा क्रमांक
पटकावत गुणवत्ता यादीत आपली नोंद केली.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांचा सक्रिय सहभाग हे तीन प्रमुख स्तंभ ठळकपणे दिसून येतात. विशेष म्हणजे, संस्थेच्या व्यवस्थापनाने अवलंबलेली ‘गुणवत्ता-केंद्रित शिक्षण प्रणाली’, नियमित मूल्यमापन, वैयक्तिक लक्ष आणि आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा प्रभाव या निकालातून प्रकर्षाने जाणवतो.
संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. सुमितदादा कोल्हे व संचालिका सौ. निकिता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक उत्कृष्टतेचा उच्चांक गाठला आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व कार्यकारी विश्वस्त अमितदादा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. यावेळी नॉन-अकॅडमिक संचालक डी. एन. सांगळे, असिफ सय्यद (GSO), प्राचार्य प्रवीण शेळके, स्वप्नील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
संजीवनी अकॅडमीचा हा निकाल केवळ शैक्षणिक यश नाही, तर व्यवस्थापनाच्या उच्च दर्जाच्या नियोजन, गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या धोरणाचे ठोस उदाहरण ठरला आहे.

